IFSC : IBKL0116JSB | Ph: 02323-246252

इतिहास

History

आजरा ,कोल्हापूर जिल्ह्याचे एक टोक ! प्रचंड पाऊस, आणि यामुळेच नद्या,नाले ,डोंगर कपारीचा प्रदेश ! निसर्गाने येथील जनतेस भरभरून सुर्ष्टी सौन्दर्य प्रदान केले आहे.प्रभू रामचंद्र आणि सीतामाई यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेले क्षेत्र रामतीर्थ !
 
भागात पूर्वी भात हेच मुख्य पीक आजऱ्याचा घनसाळ, काळा जिरगा,भात!
पीक जशी  सुवहासिक त्याचप्रमाणे या मातीत राबगार शेतकरी कष्टकरी हळवा ! सर्वांचं  हित जपणारा ,सर्वाना सांभाळून घेणारा . याच पेरणेतून या भागात सहकार रुजला , वाढला , फोफावला !
 
उसासारखी नगदी पीक १९५५-६५ च्या काळात फार कमी ऊस गुऱ्हाळघरात गाळून गुळाचे तयार करून गरजेपुरता गूळ तयार व्हायचा !
जनता  कष्टकरी पण परिस्थिती बेताची त्यामुळे सावकारी कर्जाच्या विळख्यात रुतलेली कष्टाला  भांडवलाची गरज होती . त्यातुन जनतेला स्वतःची वित्तीय संस्था हवी होती आणि यातूनच जनता बँक निर्मितीचे बीज रोवले गेले.
 
इचलकरंजी जहागीरीचा आजरा हा मुलुख वस्यनगरी  म्हणून तिचा नावलौकिक इचलकरंजी अर्बन बँकेची एक शाखा आजऱ्यामध्ये  कार्यरत  होती .

आजऱ्यातील जेष्ठ नेते अमृतराव संताजीराव देसाई (काका) ,बळीराम दत्तात्रय देसाई ,दत्ताजीराव गोविंद सावंत (अण्णाजी),विश्वनाथ धुंडाप्पा महाळंक ,शंकरराव रामचंद्र तुंरबेकर ,मल्लापा बसाप्पा शेणगावे ,गोपाळराव आबाजी  इंजल ,केशव रामचंद्र सामंत ,वसंतराव आबाजी  देसाई , केशव भिकाजी टोपले ,बाळकू रामा पाटील (आबा)  , गुंडोपंत बाळा शिंपी ,बसवानी सोमलिंग डांग ,गुंडू लिंगू पाटील ,पुंडलिक बाबाजी नलवडे, या मंडळींचे मनात आपल्या स्वतःच्या बँकेबाबतचे असणारे  स्वप्न दिनांक २ जून १९६३ रोजी साकार झाले जनता सहकारी बँक लि., आजरा या नावाने खऱ्या अर्थाने जनतेची बँक स्थापन झाली जनतेची बँक बहुजन समाजाची बँक खेड्यापाड्यातील गावाघरासह आजऱ्याची बँक स्थापन झाली आणि बँकेचे संस्थापक / चेअरमन  म्हणून विश्वनाथ धुंडाप्पा महाळंक याना पहिला मान मिळाला आणि जनता बँक जनतेच्या सेवेसाठी कार्यरत झाली . 

सरकारी दप्तरी बँकेची नोंदणी दिनांक ५ एप्रिल १९६३ इ . रोजी झालीं व बँकेला नोंदणी क्रमांक रजि.नं.के .पी.आर /बी .ऐन .के./३०२ असा मिळाला.बँकेचे वर उल्लेख केलेले संस्थापक मंडळाने फार मुसद्दीपणाने बँक स्थापनेसाठी प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांना भारताचे माजी उपपंतप्रधान मा. यशवंतराव चव्हाण यांनी लक्ष्य घालून पुर्नवत्व दिले .
 
 खास बाब म्हणूनच जनता बँकेची नोंदणी झाली .बँकेच्या  पहिल्या अहवाल सालाची आकडेवारी अशी सभासद संख्या ४५०, भाग भांडवल २१ हजार ,ठेवी ६५ हजार ,कर्ज १० हजार .

पहिले वर्ष संपले , दुसरे संपले – वर्ष वाढत चालली . भाडयाच्या जागेत का असेना बँक चालू राहिली .१४ वर्षानंतर दि .२१/०४/१९७७ या दिवशी शाखा महागाव जनता बँकेची  पहिली शाखा गडहिंग्लज तालुक्यात सुरु झाली .आणि बँकेची स्वतःची इमारत असावी . बँकेचे प्रशस्त  मुख्यालय असावे अशी मागणी सभासदांकडून  होऊ  लागली . तत्कालीन चेअरमन गोपाळराव इंजल यांचे हस्ते दि .१५/०३/१९७९ रोजी भूमी पूजन झाले .मा. विश्वनाथ महाळंक यांचे हस्ते पाया खुदाईचा मुहूर्त झाला आणि बँकेची आजरा बाजारपेठत प्रशस्त  इमारत दिमाखाने उभी राहिली .

याच वर्षात चंदगड तालुक्यात कोवाड येथे दि.२७/०१/१९७९ इ.रोजी स्वामीकर रणजित देसाई यांचे शुभ हस्ते उदघाटन झाले. दि.२१/०१/१९८२ इ. रोजी राधानगरी तालुक्यात सरवडे येथे बँकेची तिसरी शाखा व दि.२९/०४/१९८२ इ. रोजी का.वाळवा येथे चौथी शाखा सुरु झाली. अशाप्रकारे शाखाविस्तार सुरु झाला.
 
२ जून १९८७ इ. रोजी बँकेने रौप्य महोत्सवी वर्षात प्रदार्पण केले. रौप्यमहोत्सवी वर्षात नूतन शाखा नूल उदघाटन  शाखा इमारत बांधकाम , सहकार शिबिराचे आयोजन , गरीब व मागास विधार्थ्याकरिता शिष्यवृत्ती   विध्यार्थ्यांना मिस्टांग भोजन देऊन सामाजिक बांधिलकी पार पाडली आहे . वर्षाअखेरीस रौप्य महोत्सव सांगता समारंभ दिमाखात पार पडला. कार्यक्रमाचे औचित्य साधून  सभासदांना ताट व वाटी  भेटवस्तू म्हणून वाटप करण्यात आली .

दि.२२/०५/१९९३ इ. रोजी शाखा राजाराम रोड ,कोल्हापूर येथे स्वमालकीचे इमारतीत सुरु झाली.त्यापाठोपाठ दि.१७/१२/१९९५ इ.रोजी मुरगूड तर दि.२२/०७/१९९६ इ. रोजी शाखा हुपरी येथे शाखा सुरु झाल्या. दि. ०४/०९/१९९७ इ.रोजी गडहिंग्लज येथे तर दि.१७/१०/१९९७ इ. रोजी शिनोळी ,ता.चंदगड व दि. २०/०२/१९९८ इ.रोजी शाखा खरी कॉर्नर ,कोल्हापूर येथे शाखा सुरु केल्या. त्यानंतर  दि. ०३/०९/२००२  इ.रोजी शाखा सांगली येथे व दि. १९/१०/२००२  इ.रोजी शाखा सावंतवाडी येथे सुरु झाली. 
 
आज अखेर आजरा येथील मुख्यालय व वर नमूद केलेल्या १४ शाखेसह बँकेचा विस्तार तीन जिल्ह्यात झालेला आहे. 
१) इचलकरंजी अर्बन को. ऑफ बँक लि.,इचलकरंजी या बँकेचे शाखा आजरा बंद करून सर्व व्यवहार जनता बँकेकडे वर्ग केल्याने बँकेस फार मोठा आधार मिळाला.
२)दि. २ जुन १९६३ इ. रोजी खा.गुलाबराव  पाटील यांचे हस्ते व आमदार व्ही. के. चव्हाण  यांच्या  अध्यक्षतेखाली उदघाटन सोहळा पार पडला.
३) भागातील प्रतिकूल अवस्थेत जीवन जगणाऱ्या गरीब कुटुंबांना मदतीचा हात देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता बँकेची स्थापना.
४) बँकेची सुरुवात भाडयाच्या इमारतीत करणेत येऊन सन १९८१ साली स्वमालकीच्या  इमारतीत बँकेचे स्थलांतर करणेत आले.

बँकेचे संस्थापक : कै.श्री. अमृतराव संताजीराव देसाई (काका)
 
संस्थापक चेअरमन : कै.श्री.विश्वनाथ धुंडाप्पा महाळंक
 
संस्थापक सदस्य :
१.कै.श्री.बळीराम दत्तात्रय देसाई                                       २.कै.श्री.दत्ताजीराव गोविंद सावंत 
३.कै.श्री.शंकरराव रामचंद्र तुंरबेकर                                   ४.कै.श्री.मल्लापा बसाप्पा शेणगावे                    
५.कै.श्री.गोपाळराव आबाजी  इंजल                                  ६.कै.श्री.केशव रामचंद्र सामंत                      
७.कै.श्री.वसंतराव आबाजी  देसाई                                   ८. कै.श्री.केशव भिकाजी टोपले                                                         
९. कै.श्री.बाळकू रामा पाटील (आबा)                                 १०.कै.श्री.गुंडोपंत बाळा शिंपी                    
११.कै.श्री.बसवानी सोमलिंग डांग                                     १२.कै.श्री.गुंडू लिंगू पाटील                             
१३.कै.श्री.पुंडलिक बाबाजी नलवडे
 
स्थापना दिनांक ०२/०६/१९६३ 
 
नोंदणी तारीख : रजि.नं.के .पी.आर /बी .एन.के./३०२  दिनांक ५ एप्रिल १९६३
 
रिझर्व बँक लायसन्स : युबीडी/एमएच/४५१/पी   दिनांक ०१/०३/१९८६  
 
सुरवातीची स्थिती :
सभासद संख्या       ४५० 
भागभांडवल           २१ हजार 
ठेवी                     ६५ हजार  
कर्ज                      १० हजार