Chairman’s Desk

मा. चेअरमनसो यांचे मनोगत –

सन्माननीय बंधू . भगिनींनो – 

   आजरा ग्रामदैवत श्री.रवळनाथ यांचे कृपाशिर्वादाने  आज दिनांक १७/०९/२०१७ इ. रोजी संपन्न होत असलेल्या ५५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस आपण सर्वजण अगत्य पूर्वक उपस्थित राहिलात या बद्दल मी प्रथमतः सर्व संचालक मंडळ सदस्यांचे वतीने आपणास द्यन्यवाद देतो.  आज रोजी  बँकेचा पाया घालणारे प्रवर्तक मंडळ कै. अमृतकाका देसाई ,कै.विश्वनाथ महाळंक ,कै.दत्ताजीराव सावंत ,कै.बळीराम देसाई ,कै.शंकर तुरबेकर ,कै.मल्लापा शेणगावे,कै. गोपाळराव इंजल ,कै.केशव सामंत ,कै.वसंतराव देसाई ,कै.केशव टोपले ,कै.बाळकू पाटील ,कै.गुंडोपंत शिंपी ,कै.बसवानी डांग,कै.लिंगु व पुंडलीक नलवडे यांची आठवण करणे मी माझे कर्तव्य समजतो.             

   अतिशय दुर्गम भागात ज्या ठिकाणी गाव-गावांना जोडणारे रस्ते नव्हते, वीज, पाणी व वाहतुकीची साधने नव्हती ,प्रचंड पाऊस आणि बहुजन समाज आर्थिक दृष्टया अतिशय मागास ,खेड्या पाड्यात ,वाडी वस्तीवर विखुरलेला अशा  परिस्थितीत रिझर्व्ह बँकेची लायसेन्स  मिळवून बँक काढणेचे स्वप्न पहाणे हे केवळ आणि केवळ दिवास्वप्न होते !
काळ्याकुठ्ठं अंधारात पणती तेवावी, त्याप्रमाणे जनता बँकेची स्थापना या दिग्गजानी केली त्यानां  कोटी कोटी प्रणाम !

   या वर्षीचा ताळेबंद , अहवाल आपल्या हातात आहेच ! स्थापनेपासून आजपर्यंत बँकेचा लेखाजोखा या अहवालामध्ये आहे. प्रचंड चढ उतार ,परिश्रमाची पराकाष्ठा करीत आपण ५५ वर्ष पूर्ण केली .
मात्र हा कष्ठाचा काळ संपलाच असे म्हणता येत नसेल तरी सर्व संकटावर मात करीत आपल्या बँकेने यशाची अनेक शिखरे पार केलेचे अहवालातील आकडेवारीवरून  आपणास समजून आले असेल.
बँकिंग बदलले आहे ,बदलते आहे ,दररोज तंत्रज्ञानांत झपाटयाने बदल होत आहे ,या तंत्रज्ञान मुक्त लाटेवर स्वार होणारा फक्त टिकेल ! फक्त “सक्षम “असणाराच टिकेल !हे भविष्य आहे .

बँकेने संगणक प्रणाली पूर्णत्वास नेली.स्वतःचे डेटा सेंटर सुरु केले ,कोअर बँकिंग सोल्युशन प्रणाली यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेली . RTGS,NEFT,SMS अलर्ट इ.सेवा बँकेत सुरु झाल्या.चार ठिकाणी अदयावत CRM रिसायकल मशीन ए.टी.एम . सुरु झालेली आहेत .मागील वर्षी घोषणा केले प्रमाणे बँकेच्या शाखा शिनोळी व मुरगूड येथे शाखा इमारत बांधकाम पूर्णत्वास नेणेचे दुर्ष्टीने कामकाज सुरु आहे . बँकेचे मुख्यालय व चौदा शाखापैकी मुख्यालयाचे सुसज्य अशी कार्पोरेट लुक असणारी इमारत असून चौदा शाखापैकी १० शाखांच्या स्वमालकीच्या प्रशस्त इमारती आहेत . उर्वरित चार शाखांच्या देखील लवकरच पूर्णत्वास नेणेत येतील अशी ग्वाही मी या ठिकाणी देत आहे.   बँक अधिकाधिक प्रगतीपथावर नेण्याकरिता बँकेचे संचालक मंडळ व कर्मचारी यांनी ध्यास घेतला  आहे तरीही बँकिंग पुढे नवनवीन आव्हाने आहेत .०८/११/२०१६ ची नोटबंदी, मागील वर्षातील अपुरे प्रजन्यमान ,उपसाबंदी ,RBI च्या नवनवीन आव्हानात्मक परिपत्रक यामुळे थोडीशी शिथिलता वाटली तरीही आपण तितक्याच नेटाने या सर्व संकटाचा सामना करीत आहोत .    बँकिंग मधील बदलाचे वारे कर्मचाऱ्यापर्यंत  पोहचले पाहिजे या उद्धेशाने मुख्यालयात सुसज्य असे ‘प्रशिक्षण केंद्र ‘ सुरु केले असून सर्व कर्मचार्यांना नियोजनबद्ध रित्या प्रशिक्षण कार्यक्रम राबवून प्रशिक्षित केले जात आहे.   बँकेने पुढील काळात आपले कार्यक्षेत्र संपूर्ण ‘महाराष्ट्र राज्य ‘ करणेचे ठरिवले आहे . राजधानी मुंबई येथे शाखा सुरु करणेचे आमचे स्वप्न आहे.या करिता RBI चे नियमांची पूर्तता करावयाची आहे.सर्व सभासदांनी आपली शेअर्स रकमेची पूर्तता करून बँकेस सहकार्य करावे अशी सर्वाना विनंती करतो.भाग भांडवल मोठ्या प्रमाणात जमा होणेकरिता ,कर्मचारी ,संचालक प्रयत्नशील  राहतील अशी ग्वाहि मी या ठिकाणी देत आहे !  बँकेच्या आर्थिक प्रगतीचा तक्ता मी खाली देत आहे . त्यावरून आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच ही प्रगती  साधता आली हे मी नम्रपणे नमूद करतो.यापुढेही असेच सहकार्य राहावे ही नम्र  विनंती .                 

जयहिंद जय महाराष्ट्र !      

Scroll to Top