ATM User Manual

एटीएम कार्ड वापरा संदर्भात मार्गदर्शक सूचना

जनता बँकेच्या नवीन रूपे कार्ड मध्ये तुमचे स्वागत आहे. सदर कार्ड हे एटीएम कम डेबीट कार्ड आहे व हे कार्ड तुम्हाला भारतातील कोणत्याही एटीएम मधून या कार्डाचा वापर करून पैसे काढण्याची सुविधा मिळत आहे. तसेच  जनता बँकेच्या कोणत्याही एटीएम  मधून इतर बँकेच्या एटीएम  कार्ड वापरून पैसे मिळू शकतात आणि त्याच बरोबर जनता बँकेच्या खातेदारांसाठी पैसे जमा करण्याची सोय बँकेने आपल्या एटीएम मध्ये केली आहे.

या माहिती पत्रकामध्ये कार्ड वापरासंबंधीच्या सर्व अटी व शर्ती नमूद केल्या आहेत. या कार्डचा वापर ज्या वेळी तुम्ही कोणत्याही बँकेच्या एटीएम मध्ये कराल त्यावेळी तुम्हाला या अटी व शर्ती मान्य आहेत असे समजले जाईल.
कार्डचा वापर करण्यापूर्वी आपण आपला मोबाईल नंबर कृपया रजिस्टर करावा कारण कोणताही व्यवहार झालेस  आपणाला सदर नंबरवर एस एम एस येईल.

आपल्याला कोणत्याही एटीएम मधून खालील सुविधा प्राप्त होतील.

  • पिन नंबर बदलणे
  • बॅलन्स पाहणे
  • मिनी स्टेटमेन्ट
  • पैसे काढणे

मार्गदर्शक तत्वे :-
 कार्ड मिळाल्यानंतर कार्डच्या पाठीमागील भागात ज्या ठिकाणी सहीला जागा आहे त्या ठिकाणी आपली सही करावी.
तुम्हाला मिळालेले नवीन रूपे कम डेबीट कार्ड मिळाल्यानंतर लगेच आपल्याला मिळालेले पिन नंबर बदला व आपणाला आलेले पिनचे पत्र नष्ट करा.
तुमचा पिन नंबर गोपनीय ठेवा व आपल्या जवळच्या व्यक्तीला सुद्धा सांगु नका.
आपला पिन नंबर वारंवार बदलत रहा.
एटीएम रूम मध्ये कोणत्याही अनोळखी माणसाची मदत घेऊ नका.
आपला पिन नंबर बदलत असताना कोणालाही पाहू देऊ नका.
तुमचा पिन नंबर कार्डवर लिहू नका.

आपली बँक अशी कोणतीही माहिती आपल्या ग्राहकांकडून फोन व मेल वरून घेत नाही.

कार्डची काळजी :-
तुमचे कार्ड सुरक्षित ठेवा.
कार्ड टीव्ही मोबाईल जवळ ठेऊ नका.
मॅग्नेटिक पट्टीवर खाडाखोड करू नका.
चुंबकीय पदार्थाजवळ आपले कार्ड ठेऊ नका.
कार्ड दुमडू नका.
कार्ड सूर्यकिरणांमध्ये , आगीजवळ ठेऊ नका.
कार्ड तेलासारख्या पदार्थापासून दूर ठेवा.
कार्ड हरवले अथवा चोरीला गेलेस लगेच बँकेला तशी सूचना करावी.

खालील ठिकाणी कार्डचा वापर करता येईल:-
कोणत्याही एटीएम मधून पैसे काढण्यासाठी शॉपिंग (वस्तू खरेदीसाठी )
हॉटेलिंग करणेकरीता
सिनेमा तिकीट खरेदी करणेकरीता

पेट्रोल पंपावर पेट्रोल बिल देणे करीता

एटीएम स्क्रिनवर विविध पर्याय उपलब्ध होतील त्यामधील आपणाला पाहिजे तो पर्याय निवडा.
(उदा.कॅश विथड्रावल,पिन चेंज, मिनी स्टेटमेंट इ.)

पैसे काढणेकरिता आपली पैसे काढण्याची मर्यादा विचारात घ्या.

आपणाला जनता  बँक  चे  ATM वरून  पैसे काढणेकरता खालील पद्धत वापरावी लागेल :-
दरवाजा जर अक्सेस लॉक चा असेल त्या लॉक मध्ये आपले कार्ड मॅग्नेटिक पट्टीचा विचार करून वापरावे.
तुमचे कार्ड एटीएम मशिन मधील कार्ड स्लॉट मध्ये घालावे व व्यवहार पूर्ण होई पर्यंत कार्ड काढू नये .
कृपया आपली  भाषा निवडा.
कृपया आपली रक्कम १०० च्या पटीत नोंदवा.
तुम्हाला पावती हवी असेल तर हो हा बटण निवडा.
कृपया तुमचा पिन नोंदवा.
जर आपण तीन वेळा चुकीचा पिन नंबर भरला तर आपले कार्ड त्या दिवसापुरते बंद होईल.
कृपया तुमची रोकड घ्या .
तुमचा व्यवहार पूर्ण झालेला आहे .
कृपया तुमची पावती घ्या .

वार्षिक कार्ड चार्जेस रु  १२५ /+ जी. एस. टी.

डुप्लिकेट कार्डकरीता रु.  १५०/+ जी. एस. टी.

ग्रीन पिन चार्गेस  रु  ५.०० /- + जी. एस. टी.

नवीन पिन चार्गेस रु  २५.०० /- + जी. एस. टी.

व्यवहारासाठीचे चार्जेस :-
पहिले ५ व्यवहार मोफत असतील.

पाच व्यवहारानंतर प्रत्येक कॅश व्यवहाराकरिता  २१/+ जी. एस. टी.

पाच व्यवहारानंतर प्रत्येक नॉन -कॅश व्यवहाराकरिता  ६ /+ जी. एस. टी.

ATM CARD BLOCK करणे साठी:- 

  1. आपण आमच्या मोबईल बँकिंग अप वापरून आपले ATM कार्ड  block करू शकता
  2. आपण आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क करून आपले ATM कार्ड  block करू शकता
  3. ८२८२८०९९८० या आमच्या ग्राहक सेवा क्रमांकशी संपर्क करून आपले ATM कार्ड  block करू शकता.
Scroll to Top